मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांना दिलासा 

सार्वजनिक सुटी दिवशीच काम ः केंद्रीय निवडणूक आयोगाची न्यायालयात हमी

मुंबई  – विना अनुदानीत खाजगी शाळांच्या शिक्षकांप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांनाही निवडणूकीच्या कामाला जुंपणाऱ्या निवडणूक आयोगाने एक पाऊल मागे घेत केवळ सार्वजनिक सुटीच्या दिवशीच प्राध्यापकांना निवडणुकीच्या कामांसाठी बोलावले जाईल, अशी हमी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.

निवडणुका आल्या की राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसोबत शिक्षक आणि विद्यापीठाच्या प्राध्यापकांनाही निवडणूक आयोगाकडून कामाला जुंपण्यात आल्याने मुंबई विद्यापीठ प्राध्यापक संघटनेच्या वतीने ऍड. मिहीर देसाई यांनी इलेक्‍शन ड्युटीला विरोध करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम. एस. संकलेचा यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.

यावेळी महाविद्यालयातील परिक्षांचा कालावधी असल्याने त्या कामात प्राध्यापक व्यस्त आहेत. असे असताना निवडणूकीच्या कामाची जबाबदारी पडल्यास प्राध्यापकांवर प्रचंड ताण येऊ शकतो. या दावा याचिकेत करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरूवातीलाच एक पाऊल मागे घेत,सध्या परिक्षांचा काळ सुरू असल्याने केवळ सार्वजनिक सुटीच्या दिवशीच प्राध्यापकांना निवडणुकीच्या कामांसाठी बोलावले जाईल, अशी हमी दिल्याने प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)