अंजली दमानिया यांना दिलासा

उच्च न्यायालयाकडून 21 अब्रु नुकसानीच्या खटल्यांना स्थगिती

मुंबई – भाजपाचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात तक्रार आणि याचिका दाखल केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अंजली दमानिया यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी दमानिया यांच्या विरोधात राज्यभरात विविध ठिकाणी दाखल केलेल्या 32 अब्रु नुकसानीच्या खटल्यांपैकी 21 खटल्यांना तुर्त स्थगिती दिली. तर अन्य 11 खटल्यांसदर्भात नव्याने याचिका दाखल करण्याचे निर्देश दमानीया यांना दिले आहे.

एकनाथ खडसे यांच्या विरोधात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून अंजली दमानिया यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याबरोबरच उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. त्यामुळे खडसे यांना मंत्रीपद गमवावे लागले. दरम्यान खडसें विरोधात खोटे आरोप केल्याप्रकरणी खडसे समर्थकांनी राज्यात विविध ठिकाणी अब्रु नुकसानीचे 32 खटले दाखल केले.
त्यापैकी मुक्ताईनगर, रावेर, यावल आणि शिरपूर येथील खटल्यांच्या सुनावणीला सुरूवात झाली.

दरम्यान अंजली दमानीया यांच्यावतीने ऍड. मिहिर दसाई यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या सर्व खटल्यांची एकत्रीत सुनावणी घेण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्यासमोर सुनावणी झाली असता न्यायालयाने 32 पैकी 21 खटल्यांच्या सुनावणीला अंतरीम स्थगिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)