जिओमुळे स्पर्धक कंपन्यांवर परिणाम

खासगी दूरसंचार कंपन्यांच्या संख्येत होऊ लागली घट

नवी दिल्ली: टेलिकॉम क्षेत्रात क्रांती घडवून आणल्यानंतर रिलायन्स जिओ देशातील फिचर्सफोन्सचे मार्केटमध्ये उलथा पालथ होण्याचा अंदाज चालू मार्केटमधील परिस्थिती आढावा तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे. रिलायन्स कंपनी दूरसंचार क्षेत्रात उतरल्यानंतर खासगी दुरसंचार कंपन्याची संख्या 8 वरुन 3 वर पोहोचली आहे. आता कंपनीकडून जुने फिचर फोन्स 501 रुपयाच्या दरात 4 जी सुविधा देत असल्या कारणाने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रिजकडून 21 जुलै पासून लागू करण्यात येणाऱया ऑफरमुळे बाजारातील रिलायन्स इंडस्ट्रिजचा शेअर्स वाढ दिसून येण्याचा अंदाज सांगितला जात आहे. कंपनीच्या या धारणामुळे जिओचे हॅण्डसेट बाजारात चांगले स्थान मिळवणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या वातावरणाचा परिणमा भविष्यात लहान कंपन्यांच्या उत्पादन क्षमतेवर होऊन लहान कंपन्या स्पर्धेतून बाहेर पडण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. आणि मोठ्या कंपन्या नुकसान कमी करण्याकरीता आपल्या उत्पादनात घट करतील अशी माहिती आंतरराष्ट्रीय डेटा कॉर्पोरेशनचे अधिकारी जसपाल सिंह यांनी दिली.
भारतातील बाजारात उपलब्ध असणाऱ्या फोन कंपन्यांना आपल्या उत्पादनात बदल आणि सुधारणा करण्याची गरज निर्माण होणार आहे. कारण भारतातील आपले स्थान टिकवण्याकरीता नवीन योजनांचा आधार घ्यावा लागेल. यात मार्च मध्ये जिओफोनचा शेअर 35.8 टक्के हेता. त्यापाठोपाठ सॅमसग 9.8 टक्के, आयटेल 9.4 टक्के, नोकिया 7.3 टक्के अशी दूरसंचार कंपन्यांनी बाजारातील क्रमप्राप्त जागा मिळवली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)