आरआयएमएस इंटरनॅशनल स्कूल, व्हीआयआयटी, द इनोव्हेरा स्कूल यांचे विजय

रिलायन्स फाउंडेशन युथ स्पोर्टस फुटबॉल स्पर्धा

पुणे – आरआयएमएस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्‍नॉलॉजी (व्हीआयआयटी) आणि द इनोव्हेरा स्कूल यांनी रिलायन्स फाउंडेशन युथ स्पोर्टस फुटबॉल स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.

-Ads-

डोबरवाडी येथील पीडीएफएच्या मैदानावर या लढती झाल्या. वरिष्ठ मुलांच्या गटात आरआयएमएस संघाने सिंहगड कॉलेजवर 10-0 असा मोठा विजय मिळवला. यात नेनाद कदमने (20, 25, 30 मि.) तीन गोल केले, तर दानिश अल्मेलकरने (9, 56 मि.) दोन गोल केले. अब्दुल कुवारी (28 मि.), वेंकटेश्वर सातव (45 मि.), मुबारक शेख (50 मि.) आणि आशिष शेंडगे (52 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

ज्युनियर मुलांच्या गटात इनोव्हेरा स्कूलने क्रूट मेमोरियल स्कूलवर 5-2ने मात केली. यात विजयी संघाकडून मांग तोनसिंगने (24, 37, 40 मि.) तीन गोल केले, तर हर्षवर्धन त्यागी (11 मि.) आणि आयूष खाकटेने (57 मि.) प्रत्येकी एक गोल केला. क्रूट स्कूलकडून शिवम जगताप (8 मि.) आणि आर्यन वंजारी (28 मि.) यांनाच गोल करता आले.
कॉलेज बॉइज गटात व्हीआयआयटी संघाने जयंत शिक्षण प्रसारक मंडळ संघावर एकतर्फी झालेल्या लढतीत 5-0ने विजय मिळवला. यात सौरभ आहेरने (10, 14, 35, 53 मि.) चार गोल केले, तर स्मिथने (47 मि.) एक गोल केला.

निकाल –

पीडीएफए ग्राउंड – वरिष्ठ मुले – पहिली फेरी – आरआयएमएमस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज 10 (दानिश अल्मेलकर 9, 56 मि., नेनाद कदम 20, 25, 30 मि., अब्दुल कुवारी 28 मि., वेंकटेश्वर सातव 45 मि., मुबारक शेख 50,54 मि., आशिष शेंडगे 52 मि.) वि. वि. सिंहगड कॉलेज ऑफ एसीएस 0. सिटी इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज 4 (मुर्तझा बाटी 4, 40 मि., कृष्णा तुर्काने 10 मि., अद्वैत बाजारे 50 मि.) वि. वि. न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज 1 (विशाल सरकार 32 मि.). ज्युनियर मुले – पहिली फेरी – महादजी शिंदे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज 2 (संतोष विश्वकर्मा 17, 45 मि.) वि. वि. न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज 0. न्यू इनोव्हेरा स्कूल 5 (हर्षवर्धन त्यागी 11 मि., मांग तोनसिंग 24, 37, 40 मि., आयूष खाकटे 57 मि.) वि. वि. क्रूट मेमोरीयल स्कूल 2 (शिवम जगताप 8 मि., आर्यन वंजारी 28 मि.).

महाविद्यालयीन मुले – पहिली फेरी – विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोरमेशन टेक्‍नॉलॉजी (व्हीआयआयटी), पुणे 5 (सौरभ आहेर 10, 14, 35, 53 मि., एडूस स्मिथ 47 मि.) वि. वि. जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ (जेएसपीएम) 0.
हेडगेवार ग्राउंड – वरिष्ठ मुले – लीग ग्रुप एच – सेंट उर्सूला हायस्कूल 2 (प्रजित नायर 48, 54 मि.) वि. वि. एसएनबीपी स्कूल, मोरवाडी 0.
ग्रुप जी – कमलनयन बजाज हायस्कूल 1 (प्रियांशू चौगुले 24 मि.) वि. वि. केईएस प्रतिभा आर्टस, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज 0.

वरिष्ठ मुले – पहिली फेरी – आदित्य ज्युनियर कॉलेज 1 (शुभम झगडे 12 मि.) वि. वि. डॉ. डी. वाय. पाटील एसीएस ज्युनियर कॉलेज सायन्स 0.

ज्युनियर बॉइज – दुसरी फेरी – अम्रिता विद्यालयम अँड ज्युनियर कॉलेज 0 (4) (पौरस परब, स्वप्नाज घाडगे, तन्मय काळोखे, रोहित पनवडे) वि. वि. प्रियदर्शनी स्कूल सीबीएससी 0 (3) (सुजल देवकर, रोहित शर्मा, विवेक जयचंद्रन).
महाविद्यालयीन मुले – दुसरी फेरी – पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग 3 (अमेय तळेगावकर 7, 25, 32 मि.) वि. वि. डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, आकुर्डी 0.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)