रिलायन्स फाऊंडेशन फुटबॉल स्पर्धा : जयहिंद, घोलप, इंदिरा कॉलेज लीग गटासाठी पात्र

पुणे  – जयहिंद हायस्कूलने नूतन मराठी विद्यालयावर 4-0 ने मात करून रिलायन्स फाउंडेशन युथ स्पोर्टस फुटबॉल स्पर्धेतील वरिष्ठ मुलांमध्ये लीग गटात प्रवेश केला. याचबरोबर कॉलेज गटात बाबुरावजी घोलप कॉलेज, एएसएम कॉलेज आणि इंदिरा कॉलेज यांनीही लीगमध्ये प्रवेश केला.

पीसीएमसीच्या हेडगेवार मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. वरीष्ठ मुलांच्या गटातील दुसऱ्या लढतीत पिंपरीच्या जयहिंद कॉलेजने जबरदस्त खेळ केला. त्यामुळे ही लढत एकतर्फी झाली. जयहिंदकडून पियुष रोहरा (4,5 मि.) याने 2 गोल केले. राजीव परवानी (14 मि.) याने एक गोल केला, तर केदार गरुडच्या स्वयंगोलने जयहिंदने 4-0 ने विजय मिळवला.
कॉलेज गटात बाबुरावजी घोलप कॉलेज, एएसएम कॉलेज, इंदिरा कॉलेज या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून आगेकूच केली.

-Ads-

निकालवरिष्ठ मुले – दुसरी फेरी – जयहिंद हायस्कूलअँड ज्युनियर कॉलेज – 4 (पियूष रोहरा 4, 5 मि.,राजीव परवानी 14 मि., केदार गरुड 48 मि.,स्वयंगोल) वि. वि. नुतन महाराष्ट्र विद्यापॉलिटेक्‍निक – 0.

महाविद्यालयीन मुले – दुसरी फेरी – बाबुरावजी घोलप कॉलेज – 1 (शुभम सावंत 3 मि.) वि. वि.इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट -0. एएसएम (सीएसआयटी) कॉलेज ऑफकॉमर्स, सायन्स अँड इन्फॉरमेशन टेक्‍नॉलॉजी – 3(विकाससिंग 11 मि., विनायक अनमोल 47, 52मि.) वि. वि. डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफहॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्‍नॉलॉजी – 0. 3)इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स – 9 (भुवन पिल्ले12, 17, 20, 31 मि., केविन घाडगे 14, 35 मि.,प्रत्युष सिंग 33 मि., स्वयंगोल, ओंकार यादव 39मि., ब्रेंडन वॉल्श 40 मि.) वि. वि. डॉ. डी. वाय.पाटील आर्टस, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज,आकुर्डी – 0.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)