बारामतीच्या जोखडातून जनतेला मुक्‍त कर; मुख्यमंत्र्यांचे लक्ष्मी-नृसिंहाला साकडे

कांचन कुल यांच्या प्राचराच्या सांगत सभेत राष्ट्रवादीवर “हल्लाबोल’

रेडा – इंदापूर आणि बारामती तालुका हा पवारांनी आपली राजकीय प्रायव्हेट प्रॉपर्टी बनवली होती. या दोन्ही तालुक्‍यांनी भारतीय जनता पार्टीच्या मागे खंबीर उभे राहण्यासाठी व भाजपचे उमेदवार कांचन कुल यांना निवडून देऊन इतिहास घडवण्यासाठी, जनता सज्ज झाली आहे. तसेच बारामतीच्या जोखडातून येथील जनतेला मुक्‍त कर, असे साकडे लक्ष्मी-नृसिंहाला घातले आहे. त्यामुळे यंदा असे

भाजपच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचाराच्या इंदापूर येथील सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर, मंत्री प्रा. राम शिंदे, पंकजा मुंडे, आमदार राहुल कुल, पुणे येथील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गणेश बिडकर, शासन नियुक्‍त संचालक अशोक वनवे, भाजपचे इंदापूर शहराध्यक्ष माऊली वाघमोडे, तालुका अध्यक्ष नानासाहेब शेंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ऍड. राजेंद्र काळे, आरपीआयचे शिवाजीराव्‌ वमखरे, रासपचे किरण गोपने यांच्यासह मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 1991 पासून बारामतीच्या पवार घराण्यांनी इंदापूर तालुक्‍यातील नेतेमंडळींचा विश्‍वासघात केला आहे. या केलेल्या विश्‍वासघाताला विराम देण्यासाठी जनता आतुरली आहे. भाजपला मतदान देण्याचा वेग इंदापूर तालुक्‍यातून दुपटीने होणार आहे. इंदापूर तालुका हा माझा तालुका आहे. याच तालुक्‍यात माझे कुलदैवत लक्ष्मी नृसिंह देवस्थान असून त्यास साकडे घातले असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, इंदापूर तालुक्‍यातील शेतीच्या पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा 22 गावातील प्रश्‍न हा बारामतीच्या पवार कुटुंबीयांनी आज तागायत सोडवला नाही. खरेतर मुळशी भागातील धरणाचा विषय त्यावेळेस सोडवला असता तर इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांना कधीच पाणी मिळाले असते. याच गावांना भाजप सरकारच्या माध्यमातून मुबलक पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. वर्षानुवर्षे येथील जनता डोळे झाकून राष्ट्रवादी व कॉंग्रेसला मतदान करते आहे. मात्र, आता या नेत्यांच्या हातात भोपळा देऊन येथील जनता राज्य आणि देश चालवण्यासाठी आगामी काळात काम करणार आहे, असाही घणाघात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. यावेळी रामदास आठवले, पंकजा मुंडे, महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीसह पवारांवर टीकास्त्र सोडले.

कुल यांची कवितेतून मतदारांना हाक
आभाळच फाटले आहे लावायचे कुठे हा प्रश्‍न राष्ट्रवादीला पडला आहे. म्हणूनच जनतेसाठी “मी उचलला आहे’ विडा या कवितेच्या ओळी गात भाजपला साथ देण्याची हाक भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी मतदारांना घातली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)