“ब्लॅक’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीज

सनी देओल आणि करण कपाडिया यांच्या “ब्लॅक’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीज करण्यात आले असून “वॉर्निंग नहीं दूंगा’ असे त्याचे बोल आहेत. या गाण्यात ऍक्‍शन आणि मारामारीचे दृश्‍य आहेत. ज्यात एटीएस ऑफिसर आपल्या मिशनसाठी सज्ज असल्याचे दिसतात.

बेहजाद खम्बाटा यांनी दिग्दर्शित केलेल्या “ब्लॅक’ चित्रपटात सनी देओलसोबत डिंपल कपाडियाचा भाचा करण कपाडिया झळकणार आहे. या चित्रपटातून करण बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. ज्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता मेकर्सनी चित्रपटातील पहिले गाणे लॉन्च केले आहे.

या चित्रपटात सनी देओल अँटी टेररिस्ट स्क्‍वॉड ऑफिसरची भूमिका साकारत आहे. तो शरीरातील अटॅच्ड लाइव बॉम्ब डिफ्यूज करण्याच्या मिशनवर असतो. तर करण हा सुइसाइड बॉम्बनची भूमिकेत दिसणार आहे. जो मुंबई मिशनवर असतो, पण काही कारणांमुळे तो स्वतःची स्मरणशक्‍ती विसरतो.

या चित्रपटातील “वॉर्निंग नहीं दूंगा’ हे पहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले असून राघव सच्चरने ते कंपोझ केले आहे. गाण्याचे बोल कुमार यांचे असून अमित मिश्रा यांचा आवाज देण्यात आला आहे. दरम्यान, हा चित्रपट पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here