रणबीर कपूरचा अजयबरोबर काम करण्यास नकार

बॉलिवूडमध्ये सध्या अनेक मोठे सिनेमे बनत आहेत. यामध्ये अजय देवगण आणि लव रंजन यांचा “रॉम कॉम’पण आहे. यामध्ये अजय देवगण आणि रणबीर कपूर एकत्र काम करणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. अजय द्वेगण वडिलांच्या रोलमध्ये तर रणबीर कपूर मुलाच्या रोलमध्ये दिसणार असे समजले होते/. मात्र ताज्या बातमीनुसार रणबीर कपूरने लव रंजनच्या या नवीन सिनेमात काम करण्यास नकार दिला आहे.

यामुळे प्रॉडक्‍शन हाऊसला मोठाच धक्का बसला आहे. खरे तर या सिनेमाची आयडिया रणबीर कपूरला खूप आवडली होती. ताने त्यामध्येकाम करण्याची तयारीही दाखवली होती. मात्र त्याच्याकडे अन्य एका मोठ्या बॅनरची मोठी फिल्म आली असल्यामुळे एकाचवेळी दोन बिग बजेट सिनेमे करणे शक्‍य नसल्याचे कारण त्याने सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता लव रंजनच्या टीमकडून रणबीरची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लव रंजनच्या या सिनेमाचे शुटिंग पुढील वर्षी सुरू होणार आहे. अजय देवगण आणि रणबीर कपूर यापूर्वी “राजनिती’मध्ये एकत्र दिसले होते. रणबीरच्या हातामध्ये “ब्रम्हास्त्र’ आणि “शमशेरा’ आहेत. तर अजयकडे “तानाजी’ आणि “टोटल धमाल’ आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)