कोस्टल रोडला स्थगिती देण्यास मुबई उच्च न्यायालयाचा पुन्हा नकार

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई – मुंबई महानगरपालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडला स्थगिती देण्यास आज मुबई उच्च न्यायालयाने पुन्हा नकार दिला आहे. जर या प्रकल्पाचे काम थांबले तर महानगरपालिकेला दिवसाला ११ कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते, अशी माहिती पालिकेच्या वतीने वकील अनिल साखरे यांनी न्यायालयात दिली. तसेच सीआरझेड १ या अतिसंवेदनशील भागातही या प्रकल्पास मंजुरी दिली गेली असल्याने, याचिकाकर्त्यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे पालिकेच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले आहे.

यापूर्वी मुंबई महानगरपालिकेसह, राज्य सरकार आणि केंद्र सरकार कडून सागरी जैव-विविधतेची कमीत कमी हानी होईल याची खबरदारी घेण्यात येईल, असे न्यायालयात सांगण्यात आले होते. तसेच स्थानिक मच्छिमारांच्या नुकसानीच्या बाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी समिती देखील स्थापन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. यावर समाधान व्यक्त करत न्यायालयाने कोस्टल रोडला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)