रेहाना फातीमा यांची बदली 

कोची  – शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून चर्चेत आलेल्या पुर्वाश्रमीच्या मॉडेल रेहाना फातीमा यांची बीएसएनएलच्या एक्‍सचेंज मधून बदली करण्यात आली आहे. त्यांना आता बीएसएनएलने पोलारिवट्टोम एक्‍सचेंज मध्ये नेमण्यात आले असून त्यांचा लोकांशी थेट संपर्क येणार नाहीं अशा स्वरूपाचे काम त्यांना देण्यात आले आहे. फातीमा या टेलिकॉम टेक्‍निशीयन असून त्या सध्या ग्राहक संपर्क सेक्‍शन मध्ये काम करीत होत्या. मंगळवारी त्यांची बदली करण्यात आली. तथापी त्यांच्यावर कोणताही शिस्तभंगाचा आरोप करण्यात आलेला नाही किंवा शिक्षा म्हणूनही त्यांची ही बदली करण्यात आलेली नाही बीएसएनएलने स्पष्ट केले आहे.

रेहाना फातीमा यांना नोकरीतून त्वरीत काढून टाकावे या मागणीसाठी शबरीमला कर्मा समितीच्यावतीने काल बीएसएनएल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्या पार्श्‍वभुमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्याच्या कारणावरून केरळ मुस्लिम जामात कौन्सिलने त्यांची मुस्लिम धर्मातूनही हकालपट्टी केली आहे. या प्रकरणात त्यांच्या घरावर हल्ला करून तेथेही मोडतोड करण्याचा प्रकार घडला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रेहाना फातीमा या विवाहित असून त्या दोन मुलांच्या माता आहेत. त्यांनी या आधीही सन 2014 मध्ये किस ऑफ लव्ह सारखी मोहीम राबवून मोठीच खळबळ उडवून दिली होती. मॉरल पोलिसींगच्या विरोधात त्यांची त्यावेळची ही मोहीम होती. त्या अत्यंत आक्रमक कार्यकर्त्या म्हणून ख्यातनाम आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)