दौंड रेल्वेच्या झोपडपट्टीचे पुनर्वसन करा; सुप्रिया सुळे यांची मागणी

दौंड – दौंड रेल्वेस्थानकालगतच्या झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तो प्रश्‍न तातडीने सोडवावा यासह दौंड रेल्वेस्थानकाला उपनगराचा दर्जा द्यावा, लोणावळा ते पुणे ते दौंड दरम्यान लोकल सेवा सुरू करावी तसेच दौंड-पुणे-लोणावळा या लोहमार्गाच्या चौपदरीकरण करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे.

रेल्वे विभागाने महसूलवाढीकरीता जाहीरातींकरीता निश्‍चित केलेल्या जागा तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसह रेल्वे खात्यासाठीचा संपूर्ण निधी खर्च करण्याच्या मुद्याकडे सुळे यांनी सरकारचे लक्ष वेधत बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड, बारामती, नीरा रेल्वे स्थानकांचे प्रश्‍न मांडले. याबरोबरच पुणे लोणावळा या लोहमार्गाचे चौपदरीकरण करण्याची मागणी त्यांनी केली.

खासदार सुळे यांनी रेल्वे मंत्रालयाच्या 2019-20 वर्षाकरीता अनुदानाची मागणी करून दरम्यान प्रवाशांसाठी दौंड ते लोणावळा मार्गावर मेमू रेल्वेसेवा सुरू करणे आणि महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एमआरआयडीसी) मुख्यालय पुण्यात स्थापन करण्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. बारामती आणि निरा रेल्वेस्थानकांचे सुशोभीकरण करणे आणि नूतनीकरणासोबतच पुणे ते दौंड मार्गावर सहजपूर आणि कासुर्डी ही नवी रेल्वेस्थानके सुरू करावीत. त्यासोबतच बारामती मतदारसंघातील दौंड तालुक्‍यातील पाटस येथे रेल्वेस्थानकावर पादचारी उड्डाणपुल उभारावा. बारामती, दौंड आणि भिगवण येथील प्रवाशांसाठी स्वतंत्र आरक्षित जागांचा कोटा द्यावा. तसेच सर्व गाड्यांचा थांबा दौंड रेल्वेस्थानकावर द्यावा. बारामती रेल्वेस्थानकासमोरील मोकळी जागा भाडेतत्वावर देऊन नागरिकांसाठी सेवारस्ता सुरू करावा. याशिवाय शिर्सुफळ गावातील गावडे वस्ती ते सोनबा पाटील वस्तीला जोडणाऱ्या रस्त्यालगतच्या बांधकामांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याची मागणीही सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

बुलेट ट्रेनसाठीच्या भूसंपादनाची माहिती द्या…
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादन करावे लागणार. त्याची सविस्तर माहिती आणि ज्यांच्या जमिनी घेतल्या जातील त्यांना मोबदला कसा देणार याची माहिती द्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. रेल्वे खात्याच्या निधीसंदर्भात चर्चेदरम्यान बोलताना त्यांनी रेल्वेमंत्र्यांनी ही माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)