चुकीच्या पद्धतीने एनआरसी लागू केल्याच्या निषेधार्थ समविचारी पक्षांच्या खासदारांचे राष्ट्रपतींना निवेदन

नवी दिल्ली: पूर्वेकडील राज्यांमधून देशात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असते. यावर चाप बसावा म्हणून आसामचे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझनशिप (NRC) प्रसिद्ध करण्यात आले आहे. यानुसार आसाममधील २.८९ कोटी लोकांचे नागरिकत्व वैध आहे तर तब्बल ४० लाख लोकांचे नागरिकत्व अवैध आहे.

“एनआरसी’चा मसुदा प्रसिद्ध झाल्यापासून आसाममधील बंगाली नागरिकांचा छळ केला जात असल्याचा आरोप तृणमूल कॉंग्रेसकडून होत आहे. ‘एनआरसी’ अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या मुद्दयावरून लोकसभेमध्ये सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती.

दरम्यान, आसाममध्ये चुकीच्या पद्धतीने एनआरसी लागू केल्याच्या निषेधार्थ समविचारी पक्षांच्या खासदारांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन दिले. तसेच भारतीय नागरीक, संविधान आणि संवैधानिक संस्था यांच्या हिताला बाधा येऊ नये अशी विनंती मा. राष्ट्रपतींकडे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)