पर्यटनासाठी सहाय्यक आयुक्त लोणकर रजेवर
महापालिकेच्या प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मनोज लोणकर हे सोमवारपासून (दि.27) 2 जूनपर्यंत पर्यटनासाठी रजेवर गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीच्या काळात महापालिका कामकाजाचा खोळंबा होऊ नये, याकरिता त्यांच्या पदाचा अतिरिक्त पदभार सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसेच “फ’ क्षेत्रीय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. हे दोन्ही अधिकारी आठवडाभर रजेवर असल्याने प्रशासकीय कामकाज पुन्हा थंडावणार असल्याचे बोलले जात आहे.
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर येत्या 3 जूनपर्यंत रजेवर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचा पदभार पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात इलेक्शन ड्युटीमुळे आयुक्तांच्या अनुपस्थितीचा परिणाम आता आणखी आठवडाभर जाणवणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची उत्तरप्रदेशात निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचा पदभार अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला होता. यादरम्यानच्या काळात कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यावर मर्यादा आणण्यात आल्या होत्या. तसेच याकाळात आयुक्तांकरिता अशा टिपणासह आदेश काढण्याचे अधिकार पाटील यांना देण्यात आले होते. आता पुन्हा एकदा आयुक्त हर्डीकरआठवडाभर रजवेर गेले आहे. दरम्यानच्या काळात पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार हे महापालिका मुख्यालयात येऊन महापालिका कामकाजात लक्ष घालणार की केवळ शोभेचे अधिकार म्हणून पदभार स्वीकारला आहे, हे लवकरच स्पष्ट होईल.