इयत्ता दहावी, बारावीची फेरपरीक्षा उद्यापासून

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा बुधवार, दि 17 जुलैपासून सुरू होत आहे. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावी परीक्षेसाठी 66 परीक्षा केंद्र, तर बारावी परीक्षेसाठी 33 परीक्षा केंद्र आहेत, अशी माहिती पुणे विभागीय मंडळाचे सचिव बी. के. दहिफळे यांनी दिली. पुणे विभागात सकाळच्या सत्रातील परीक्षा 10.30 वाजता सुरू होणार असून, परीक्षार्थींनी सकाळी 10 वाजता परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्‍यक आहे.

दुपार सत्रातील परीक्षा 2.30 वाजता सुरू होणार असून, परीक्षार्थींनी दुपारी 2 वाजता परीक्षा केंद्रात हजर राहणे अनिवार्य आहे. शहरातील टिळक रस्ता भागातील दहावीचे परीक्षा केंद्र क्रं 1042 एस.पी.एम. इंग्लिश स्कूल, एसपी कॉलेज कॅम्पस-सदाशिव पेठ येथे असून, या परीक्षा केंद्राचे उपकेंद्र डी.ई.एस. इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता येथे आहे. परीक्षार्थींनी परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रवेशपत्रावरील मुख्य परीक्षा केंद्रावर बैठक नियोजन पाहावे, असेही बोर्डाने म्हटले आहे.

उशिरा येणाऱ्यांना प्रवेश नाही
सकाळ आणि दुपारच्या सत्रात उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी अथवा पावसामुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर होऊ नये, याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन पुणे बोर्डाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)