खासगी दूध संघांकडून शासनाच्या आदेशाला हारताळ

File Photo

दूध उत्पादकांना केवळ 22 रुपये 10 पैसेच देणार
संकलन केंद्रांना दिले दर पत्रक

पुणे – खासगी दूध संघांनी शासन आदेशापेक्षा कमी दर देण्याबाबतचे दर पत्रक दूध संकलन केंद्रांना दिले आहे. त्यात 3.2 फॅक्‍ट व 8.3 एसएनएफ दूधाला 22 रुपये 10 पैसे दर देण्यात येईल असे नमूद केले असल्याने शासनाने जाहीर केलेल्या 24 रुपये 10 पैसे दराला खासगी दूध संघांनी हारताळ फासल्याचे सिद्ध होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यात गायीच्या दूधाच्या दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केल्यानंतर दूध संघांनी एक ऑगस्टपासून दरवाढ देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार पाच रुपये दरवाढ केली आहे. शासनाने मुख्यमंत्री व सचिवांच्या बैठकीचा संदर्भ देत 31 जुलै रोजी नवा आदेश काढला आहे. यामध्ये 19 रुपये 10 पैसे हे दूध संघाचे तर त्यात पाच रुपये शासन अनुदान असे एकूण 24 रुपये 10 पैसे दूध उत्पादकांना मिळणार होते. शासनाचे प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याचे सांगणाऱ्या खासगी संघांनी नवीन दरपत्रक काढले आहे. यामध्ये 3.2 फॅक्‍ट व 8.3 एसएनएफ दूधाला 17 रुपये 10 पैसे दर असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शासन अनुदान धरुन सरसकट 25 रुपये अनुदान तर सध्या मिळत नाहीच त्याचबरोबर 24 रुपये 10 पैसे हा दर सुद्धा संघांच्या अटी शर्तींमुळे मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरसकट 25 रुपये दर द्यावा, अशी मागणी केली होती. शासनाने सुद्धा पाच रुपये अनुदान जाहीर करत संघांनी 25 रुपये द्यावे, असे आदेश दिले होते. परंतु, या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)