अटलजींच्या दत्तककन्येचा लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार 

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य यांनी सन 2019ची लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. लखनौ मतदार संघातून 2019ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपाच्या नेतृत्वाने नमिता भट्टाचार्य यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात गेल्या महिन्यात नमिता भट्टाचार्य यांची भेट घेतली होती.

प्रस्तावासाठी नमिता भट्टाचार्य यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत, पण त्यांचा प्रस्ताव आपण स्वीकारू शकत नाही असे स्पष्ट केले आहे. आपला पिंड राजकारण्याचा नाही, आणि राजकारणात येण्याची आपली इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अटलजींनी 1991 पासून सलग पाच वेळ लखनौमधून लोकसभा निवडणूक जिंकली होती. तेव्हापासून येथील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपा सतत विजयी होत आली आहे. नमिता भट्टाचार्य यांना उमेदवारी देऊन सहानुभुतीच्या लाटेचा फायदा घेण्याचा भाजपाचा हेतू होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नमिता भट्टाचार्य यांच्या नकाराने ग़ृहमंत्री राजनाथ सिंह यांचा लखनौमधून निवडणूक लढवण्याचा मार्ग निर्विघ्न झाला आहे. मागील निवडणुकीतील त्यांची प्रतिस्पर्धी रीता जोशी आता भाजपात असून योगी आदित्यनाथांच्या मंत्रिमंडळात ज्येष्ठ मंत्री आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)