शरण मार्केट मनपाकडून उद्‌ध्वस्त  

नगर – शहरातील तोफखाना परिसरातील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या शरण मार्केटमधील गाळ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता शरण मार्केटचे 69 गाळे जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

तोफखाना परिसरात बेकायदेशीर गाळे बांधण्यात आल्याची तक्रार लोकायुक्ताकडे करण्यात आली होती. त्यावर सुनावणी होऊन कारवाईचे आदेश देण्यात आले होते. परंतु कारवाई होत नसल्याने नगरविकास विभागांच्या सचिवांना लोकायुक्तांनी अहवाल मागवला होता. त्यामुळे महापालिकेने शुक्रवारी (दि.12) रोजी सकाळी साडेसात वाजता कारवाईला सुरुवात झाली. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

महानगरपालिकेने कुठलाही गाजावाजा न करता अचानकपणे शरण मार्केटवर हातोडा घातल्याने अनेकांची पळापळ झाली. तसेच शरण मार्केट पाडण्यास अनेक राजकीत नेत्यांचा विरोध होता. त्यामुळे अनेकांनी याठिकाणी गर्दी केली होती. याकारवाई मुळे शहरातील राजकारणाला वेगळेच वळण मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे.

शरण मार्केटच्या ठिकाणी महानगरपालिकेचा नियोजित कुठलाही प्रकल्प नसल्याने, व ह्या गाळ्याने कोणत्याही प्रकारे रस्त्याला अडथळा ठरत नाही. त्यामुळे गाळ्यांवर कारवाई करू नये. कारवाई केल्यास महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होईल असे ही गाळे धारकांनी महापालिका आयुक्त व महापौर यांची राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली भेट घेवून निवेदन दिले होते. परंतु या मागणीचा काहीही एक उपयोग झाला नसल्याचे आज दिसत आहे.

तसेच अनेक वर्षापासून तोफखाना येथे उभी असलेली व्यायामशाळा अतिक्रमणात असल्याचे समोर आले आहे. आज केलेल्या कारवाईत ही व्यायमशाळा देखील पाडण्यात आली असून अनाधिकृत टपऱ्या देखील हटविण्यात आले आहे. या कारवाईत महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख इथापे, चार प्रभागाचे प्रभाग अधिकारी, अभियांते, प्रशांत निंबाळकर, मनोज पारखी, वैभव जोशी, मुख्यालय पथकातील रिजवान शेखे, अर्जून जाधव यांसह 50 कर्मचाऱ्यांसह दोन जेसीबी, व दोन डंपर च्या साह्याने अतिक्रमण काढण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)