इंधनाच्या दरात कपात झाल्यामुळे तेल वितरण कंपन्यांचा नफा यंदा घटणार

नवी दिल्ली: पेट्रोल, डिझेलवरील कर सरकारने घटविल्याने सामान्यांना दिलासा मिळाला असला, तरी तेल वितरण कंपन्यांच्या संकटात वाढ झाली आहे. कमजोर होणारा रुपया आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे अगोदरच संकटात असलेल्या कंपन्यांना अजून तोटा सहन करावा लागणार आहे. सरकारने सरकारी तेल वितरण कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलचा दर प्रतिलिटर 1 रुपयाने घटविण्यास सांगितले होते.
सरकारच्या या निर्णयाने हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल यांच्या नफ्यामध्ये चालू आर्थिक वर्षात मोठया प्रमाणात घट होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयाने तेल वितरण कंपन्यांच्या नफ्यामध्ये चालू वर्षात 4,500 कोटी रुपयांनी फटका बसण्याचा शक्‍यता आहे. मार्च 2018 मध्ये संपलेल्या वर्षात या तिन्ही कंपन्यांना 38,775 कोटी रुपयांचा नफा झाला होता. इक्राचे उपाध्यक्ष आर. रविचंद्रन यांच्या मते हे नुकसान 7,200 कोटी रुपयांवर जाण्याची शक्‍यता आहे. शुक्रवारी हिंदुस्थान पेट्रोलियमचा समभाग 24.50 टक्‍के, भारत पेट्रोलियम 19.60 टक्‍के आणि इंडियन ऑईल 16.25 टक्‍क्‍यांनी घसरला होता. मात्र सोमवारी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर कंपन्यांनी इंधनाच्या दरात वाढ करणे सुरू ठेवले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
2 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)