पानमसाल्यावरील जीएसटी कमी करण्याची भाजप नेत्याची मागणी

भाजपा नेत्यांची मागणी; सुपारीची आयात रोखावी 
नवी दिल्ली, दि.9-पानमसाल्यावर सध्या असलेला 18 टक्‍के जीएसटी जास्त आहे. तो कमी करून पाच टक्‍के करण्याची मागणी कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाच्या शाखेने केली आहे. त्याचबरोबर देशातील सुपारीला चांगला भाव मिळावा याकरिता सुपारीची किमान आयात किंमत प्रति किलोला 300 रुपये करावी अशी मागणीही करण्यात आलेली आहे. ती सध्या 251 रुपये प्रति किलो आहे.
देशातील दर्जेदार सुपारीचे भाव जास्त आहेत. त्यामुळे कमी किमतीच्या दर्जा नसलेल्या सुपारीची देशात मोठ्या प्रमाणात आयात होत आहे. ती आयात कमी करण्याची गरज असल्याचे कर्नाटक भाजपाने म्हटले आहे.
यासाठी कृषी, अर्थ आणि वाणिज्य मंत्रालयाला वेगवेगळी निवेदने देण्यात आली आहेत. सुपारीचे भाव कोसळल्यामुळे कर्नाटकातील सुपारी उत्पादकांची आर्थिक परिस्थिती खालावली असल्याचे सांगण्यात आले. सुपारीची अयोग्य पद्धतीने आयात केली जात आहे. ती नियंत्रित करण्याची गरज आहे. त्याचबरोबर पानमसाला बनवणारे उद्योग छोटे आहेत. पानमसाल्यावर 18 टक्‍के जीएसटी लावण्यात आल्यामुळे त्यांच्या महसुलावर आणि नफ्यावर परिणाम होत असल्याचे भाजपाचे म्हणणे आहे.
कर्नाटकमध्ये सुपारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र, दर्जाहीन सुपारीची आयात वाढल्यामुळे सुपारीचे उत्पादन घेणाऱ्यांना पुरेसा भाव मिळत नाही. त्यामुळे सुपारी उत्पादकांची परिस्थिती खराब आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)