माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भरती वाढली

नवी दिल्ली – वेगवेगळ्या क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये आलेल्या कपातीनंतर आता आयटी सेक्‍टरमधून चांगली बातमी आली आहे. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये टीसीएस आणि इन्फोसिसने गेल्या वर्षाच्या तुलनेत 42000हून अधिक नोकरदारांना कामावर रुजू करून घेतले आहे. दोन मोठ्या कंपन्यांमधल्या भरतीमध्ये 350 टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाली आहे. टीसीएसने 31 मार्चला आर्थिक वर्ष समाप्त होण्यापूर्वी 29,287 कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. तर इन्फोसिसमध्ये 24016 सॉफ्टवेअर इंजिनीअरची भरती केली आहे.

आर्थिक वर्ष 2018-19 या दोन्ही कंपन्यांनी 53,303 नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. तर आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये दोन्ही कंपन्यांनी एकूण 11,500 नव्या कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घेतले आहे. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये टीसीएसने 7,775 कर्मचाऱ्यांना कामावर ठेवून घेतले होते. तर इन्फोसिसने 3,743 कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. 167 अब्ज डॉलरचा भारतीय सॉफ्टवेअर सेवा उद्योग प्रगतिपथावर जातोय.

2019 मध्ये आयटी कंपन्या डेटा सायन्स, डेटा एनालिसिस, सोल्युशन आर्किटेक्‍ट्‌स, प्रोडक्‍ट मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन आणि सायबर सिक्‍युरिटीमध्ये तज्ज्ञ असलेल्यांची या कंपन्या भरती करणार आहेत.

आयटी क्षेत्रात 2.5 लाख नव्या नोकऱ्या उत्पन्न होणार असल्याचा अंदाजही आहे. सरकारला रोजगाराच्या मुद्द्यावर लागोपाठ विरोधकांकडून प्रहार सहन करावा लागत आहे. गेल्या पाच वर्षांचा मोदी सरकारचा कार्यकाळ हा जॉबलेस राहिला. सरकारने दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले हाते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)