ई-चलनाद्वारे कोट्यवधींचा दंड वसूल

-सीसीटीव्हीव्दारे नियमभंग करणाऱ्या साडेसहा लाख जणांवर कारवाई
– 87 हजार 637 केसेसमध्ये पावनेदोन कोटी दंड वसूल
– ई-चलनव्दारे 12 लाख 14 हजार 500 जणांवर कारवाई
– 7 लाख 24 हजार 494 जणांकडून साडेसतारा कोटी दंड वसूल

पुणे – वाहतूक शाखेसाठी सीसीटीव्ही आणि ई-चलन डिव्हाई मशीन्सचा बेशीस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होताना दिसत आहे. याव्दारे वाहतूक शाखेला कोट्यवधी रुपये दंडाच्या स्वरुपात वसूल केले आहेत. वाहतूक शाखेने 2018 मध्ये सीसीटीव्हीव्दारे नियमभंग करणाऱ्या 6 लाख 33 हजार 424 जणांवर कारवाई केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यापैकी 87 हजार 637 केसेसमध्ये 1 कोटी 85 लाख 89 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर, ई-चलनव्दारे 12 लाख 14 हजार 500 जणांवर कारवाई करून त्यापैकी 7 लाख 24 हजार 494 जणांकडून 17 कोटी 51 लाख 15 हजार 242 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सीसीटीव्हीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात कंट्रोल रुमव्दारे नियंत्रण केले जात आहे. तर प्रत्यक्षात रस्त्यावर वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पावती पुस्तिका ऐवजी ई-चलन डिव्हाईस देण्यात आले आहे.

सीसीटीव्हीव्दारे करण्यात आलेली कारवाई

वर्षे केसेस अकारण्यात आलेला दंड पैसे किती केसेसमध्ये दंडाची जमा रक्‍कम
2018 6,33,424 13,79,13,900 87,637 1,85,89,700
2017 4,51,478 10,90,32,400 48,479 1,10,80,100

ई-चलन डिव्हाईसव्दारे कारवाई

वर्षे केसेस अकारण्यात आलेला दंड पैसे किती केसेसमध्ये दंडाची जमा रक्‍कम
2018 12.14.500 32,66,14,397 7,24,494 17,51,15,242
2017 8,39,609 21,34,55,028 5,67,344 12,70,88,354

सीसीटीव्हीव्दारे 342 आरोपी अटकेत

सीसीटीव्हीचा पुणे पोलिसांना गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होताना दिसत आहे. पुणे पोलिसांनी 2018 मध्ये सीसीटीव्हीव्दारे 342 आरोपींना अटक केली आहे. तर 2017 मध्ये 149 आरोपींना जेरबंद केले होते. यातील आरोपींकडून 2018 मध्ये 74 लाख 94 हजार 170 रुपये तर 2017 मध्ये 21 लाख 7 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अपघात, वाहनचोरी, जबरी चोरी तसेच खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींचा मागही सीसीटीव्हीव्दारे लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)