नऊ ग्रामपंचायत निवडणुकींसाठी
कराड – कराड तालुक्यातील नऊ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शनिवारी शेवटच्या सरपंच पदासाठी सोळा तर सदस्यपदासाठी नव्वद असे एकूण 106 उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाकडे सादर झाले. शनिवारी शेवटच्या दिवसी सरपंचपदासाठी मसुरमधून चार, सदस्यपदासाठी एकोणीस अर्ज, वाण्याचीवाडी सरपंचपदासाठी एक, सदस्यपदासाठी तीन अर्ज, यादववाडी सदस्यपदासाठी सात अर्ज, माळवाडी सरपंचपदासाठी दोन तर सदस्यपदासाठी पाच अर्ज, वडोली भिकेश्वर सरपंचपदासाठी तीन तर सदस्यपदासाठी एकोणीस अर्ज.
धनकवडी सरपंचपदासाठी एक तर सदस्यपदासाठी पाच अर्ज, कचरेवाडी सदस्यपदासाठी चार अर्ज, पवारवाडी सरपंचपदासाठी एक तर सदस्यपदासाठी सात अर्ज, राजमाची सरपंचपदासाठी चार तर सदस्यपदासाठी एकवीस अर्ज दाखल झाले. नऊ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सरपंचपदासाठी यादववाडी व कचरेवाडी ग्रामपंचायती वगळता इतर ग्रामपंचायतीतून एकूण 33 उमेदवारी अर्ज दाखल झाले तर सदस्यपदासाठी सर्व ग्रामपंचायतीतून एकूण 188 अर्ज दाखल झाले.
इच्छूकांनी आपले उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रांची, 11 रोजी छाननी होणार आहे. दि. 13 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत मुदत असून दि. 24 रोजी मतदान आणि दि. 25 रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा