ओबीसी आरक्षणाची पुनर्रचना करावी : समितीची मागणी

ओबीसी आरक्षण-संरक्षण कृती समितीची मागणी

लातूर: राज्य सरकारने नुकतेच मराठा समाजाला एसईबीसीमध्ये समाविष्ट करून ओबीसींप्रमाणे सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कायदाही करण्यात आला. पण, या निर्णयामुळे मराठा समाजाला दुहेरी लाभ मिळणार आहे, तर ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे म्हणून मराठा, ओबीसींना मिळणाऱ्या आरक्षणाची पुनर्रचना करावी, अन्यथा ओबीसींच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आज लातूर येथे आयोजित ओबीसी आरक्षण-संरक्षण कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत घेण्यात आला.

1931 च्या जनगणनेच्या आधारावर मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले आहे. या जनगणनेच्यावेळी मराठा व कुणबी या दोन्ही समुदायांची लोकसंख्या 32 टक्के गृहीत धरण्यात आली व त्या आधारावर मराठा समाजास 16 टक्के आरक्षण देण्यात आले. पण, यात ओबीसीत गणले जाणारे कुणबी हेही आहेत. यामुळे मुळ ओबीसींवर अन्याय होत असून तो सरकारने दूर करावा, अन्यथा राज्यभर ओबीसींच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

आरक्षण विषयाचे अभ्यासक प्रा. हरी नरके, प्रा. श्रावण देवरे, संजय सोनवणी, लक्ष्मण माने यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली मते मांडली आहेत. राज्य सरकारने मागास आयोगाचा अहवाल जाहीर न करता तो मंजूर करण्यात आला. यामुळे ओबीसींमध्ये संशयाचे, गोंधळाचे, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच शासन सध्या मेगा भरतीची प्रक्रिया चालू करीत आहे. ही भरती मुळ ओबीसींवर अन्याय करणारी आहे. ओबीसींचा आतापर्यंत साठून राहिलेला अनुशेष भरून काढूनच मेगा भरती करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)