साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटक पदासाठी तीन नावांची शिफारस

यवतमाळ: ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत आयोजन समितीने संमेलनाचे उद्‌घाटक म्हणून आता तीन नवीन नावांची शिफारस केली आहे.

यात प्रसिद्ध साहित्यिक महेश एलकुंचवार, सुरेश द्वादशीवार आणि विठ्ठल वाघ यांचा समावेश आहे. मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाच्या आयोजन समितीला पत्र पाठवून नवीन उद्‌घाटक म्हणून आपणास काय सुचवायचे आहे, अशी विचारणा केली होती. त्यावर आयोजन समितीने संमेलनाचे उद्‌घाटक म्हणून तीन नावे सुचवली आहे.

यवतमाळ मराठी साहित्य संमेलन बाबत निमंत्रण संस्थांमधील अनेकांनी न येण्याचा निर्णय घेण्याची चळवळ सुरू झाली आहे. त्या परिस्थितीतमध्ये निमंत्रक संस्थाची भूमिका काय आहे ते तातडीने कळवावे. तसेच उद्‌घाटक म्हणून आपणास काय सुचवायचे ते सुद्धा तातडीने सुचवावे, असे पत्र साहित्य महामंडळाने यवतमाळ आयोजन समितीला पत्र पाठवले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)