2700 कोटींच्या संरक्षण सामग्री खरेदीला मान्यता

नवी दिल्ली – डिफेन्स ऍक्वीझीशन कौन्सिलच्या आज सकाळी झालेल्या एका महत्वाच्या बैठकीत 2700 कोटी रूपयांच्या संरक्षण सामग्री खरेदी प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या सामग्रीत नौदलाच्या कॅडेट्‌सना प्रशिक्षण देण्यासाठी तीन जहाजांचा समावेश आहे.

ही जहाजे मदत आणि बचाव कार्यासाठीही उपयोगी पडणारी आहेत. तसेच त्यांवर नौदलाच्या छात्रांना त्या अनुषंगाने प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्या व्यतिरीक्त अन्य कोणती सामग्री यात खरेदी केली जाणार आहे याचा तपशील मात्र उपलब्ध होऊ शकला नाही. संरक्षण दलांसाठी सामग्री व शस्त्रास्त्रे खरेदीचा सर्वाधिकार डिफेन्स ऍक्वीझीशन कौन्सिलला आहेत. संरक्षण खरेदी विषयी त्यांचा निर्णय अंतिम समजला जातो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)