नगरमध्ये शिवसेना संपर्कप्रमुखांच्या विरोधात बंड

 • संपर्कप्रमुख बदला अन्यथा पक्ष सोडण्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांचा इशारा
 • शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेट केल्या तक्रारी 

  जयंत कुलकर्णी /नगर:  शिवसेनेचे नगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर व विजय पाटील यांच्याविरोधात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी बंड पुकारले असून तातडीने संपर्कप्रमुख बदला अन्यथा शिवसेना सोडण्याचा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिला असल्याचे समजते. कोरगावकर व पाटील यांच्याकडून पक्षाच्या विरोधात कारवाया होत असून भाजपच्या मंत्र्यांसह आमदारांना अनुकुल असे निर्णय घेण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पक्ष संघटनेवर त्याचा परिणाम झाला असल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

  गेल्या पंधरादिवसांपूर्वी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे व सचिव अनिल देसाई यांनी भेट घेवून कोरगावकर व पाटील यांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या आहेत. कोरगावकर संपर्कप्रमुख झाल्यापासून जिल्ह्यात शिवसेना संघटना वाढीवर परिणाम झाला आहे. त्याच्या चुकीच्या धोरणामुळे अनेकांना पक्ष सोडून जावे लागले आहे. भाजपच्या मंत्र्यांसह आमदारांना अनुकुल असे निर्णय घेण्यास भाग पाडले जात आहे. त्याबरोबर नव्याने करण्यात आलेल्या जिल्हाप्रमुखांच्या नियुक्‍त्या देखील चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्या आहेत. याबाबत तातडीने निर्णय घेवून संपर्कप्रमुख बदलण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले असून अनिल देसाई यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे सांगण्यात आले आहे.

  -Ads-
  दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

  देसाई यांच्याकडे कोरगावकर यांच्या चुकीच्या निर्णयाचे पुरावा देखील पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पंधरादिवसांपूर्वी पदाधिकाऱ्यांनी तक्रार करूनही अद्यापही कोणताही निर्णय न झाल्याने सध्या शिवसेनेचे पदाधिकारी व नेते अस्वस्थ आहेत. येत्या काही दिवसात कोरगावकर व पाटील यांच्याबाबत काही निर्णय झाला नाही तर शिवसेनेच्या नेत्यांसह पदाधिकारी पक्ष सोडण्याची शक्‍यता आता निर्णय झाली आहे.

  ठाकरे यांना याबाबत निवेदन देखील देण्यात आले आहे. या निवेदनात कोरगावकर व पाटील यांच्यामुळे पक्ष संघटन अडचणीत आल्याचे म्हटले आहे. कोरगावकर हे भाजपसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या तालावरच शिवसेना चालवित आहे. त्यांच्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे. जामखेडमध्ये कोरगावकर व पाटील यांच्या भाजपच्या पथ्यावर पडली असे निर्णय घेण्यात आल्याने निष्ठावंत शिवसैनिकांना पक्ष सोडावा लागला आहे.

  आजही ही मंडळी शिवसेनेच्या संपर्क आहे. परंतू कोरगावकर यांच्यामुळे ती पक्षात येत नाहीत. शिवसैनिकांची कामे युतीची सत्ता असून देखील होत नाही. त्याबाबत कोरगावकर काही भूमिका घेत नाही. नेते व पदाधिकाऱ्यांना देखील वेगळी भूमिका घेवू देत नाही. अशाने शिवसेना संघटनेची वाढ खुंटली आहे. पक्ष संघटनेतील बदल देखील त्याच्या मर्जीप्रमाणे करण्यात येत आहे. ज्या कार्यकर्त्यांच्या मागे एकही कार्यकर्ता नाही. अशांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यात नेते व पदाधिकारी कोरगावकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे.

  कोरगावकर व पाटील यांना तातडीने बदलून अन्य नेत्यांनी जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात यावे. हे बदल लवकरात लवकर न केल्यास नेते व पदाधिकारी वेळप्रसंगी पक्ष सोडण्याची भूमिका घेतील. असे या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे सध्या शिवसेनेत संपर्कप्रमुख बदलण्याच्या हालचाली जोरात सुरू झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)