रामोसने उत्तेजक द्रव्य घेतले नाहीत : रियल माद्रिद

माद्रिद – रियल माद्रिद क्‍लबचा कर्णधार सर्जिओ रामोसने कोणत्याही उत्तेजकद्रव्य सेवन चाचणीमध्ये दोषी नसल्याची माहिती रियल माद्रिद क्‍लबकडून सांगण्यात आले आहे. जर्मनीमधील “डेर स्पायगेल’ हे मासीक फुटबॉल विश्वातील काही धक्कादायक माहिती मागील काही महिन्यांपासून समोर आणत आहे.

या मासिकाच्या वृत्तानुसार 2017 च्या चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यानंतर झालेल्या उतिजक द्रव्य चाचणीमध्ये रामोस दोषी आढळला होता. परंतु, रियल माद्रिद क्‍लबने या वृत्तांचे खंडन केले आहे.

-Ads-

रियल माद्रीद क्‍लबतर्फे सांगण्यात आले आहे की, रामोसने कधीही उत्तेजकद्रव्य प्रतिबंधित कायद्याचे उल्लंघन केले नाही. युएएफा ने या संबधी विशेष माहिती मागविली होती. त्याची आम्ही पूर्तता केली.

अंतिम सामन्यानंतर जागतिक उत्तेजक द्रव्य विरोधी संघटनेच्यामार्फत त्याची चाचणी झाली होती. त्यात तो दोषी आढळला नाही. त्यामुळे युएएफा आणि फिफा यांना देखील रामोस दोषी नसल्याचे मान्य आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)