सरकारकडून खरी आकडेवारी लपवली जातेय : कॉंग्रेस

एनएससी प्रमुखांच्या राजीनाम्यावरून मोदी सरकारला केले लक्ष्य

नवी दिल्ली : देशातील बेरोजगारीच्या संबंधातील अहवाल दाबून टाकल्याच्या कारणावरून एनएससीचे हंगामी प्रमुख मोहनन यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या विषयावरून कॉंग्रेसने मोदी सरकारला चौफेर घेरले आहे. मोदी सरकारच्या या बेपर्वाईच्या कृतीमुळे देशातील आणखी एका महत्वाच्या संस्थेचा अंत झाला आहे असे कॉंग्रेसने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या संबंधात प्रतिक्रीया देताना कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांनी म्हटले आहे देशातील आर्थिक विषयाच्या संबंधातील खरी आकडेवारी बाहेर येऊ द्यायची नाही हा सरकारचा हेतु आहे आणि एनएससीच्या हंगामी प्रमुखांनी राजीनामा देऊन सरकारचा हेतुच साध्य करण्यास हातभार लावला आहे. कॉंग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले आहे की सरकारची रोजगार विषयाची कामगीरी अत्यंत लाजीरवाणी आहे.

तथापि त्यात बनावटपणा करण्याचा दबाव एनएससीवर आणला जात होता त्यातूनच त्या संस्थेच्या हंगामी प्रमुखांनी राजीनामा दिला आहे असा आरोप त्यांनी केला आहे. देशातील बेरोजगारीच्या संबंधात अहवाल प्रकाशित करू दिला नाही या कारणावरून नॅशनल स्टॅस्टॅस्टिकल कमिशनचे हंगामी प्रमुख पी. सी मोहनन आणि आयोगाच्या सदस्य जे. व्ही मीनाक्षी यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहे त्यावरून कॉंग्रेसने मोदी सरकारला चौफेर घेरण्याचा प्रयत्न चालवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)