पूर्ण कर्ज फेडण्यास तयार, पण… – विजय मल्या 

नवी दिल्ली – भारतीय बँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्या पूर्ण कर्ज फेडण्याची तयारी दाखवली आहे. मी बँकांचे पूर्ण कर्ज फेडण्यास तयार आहे. तरी बँकांनी माझी ऑफर स्वीकारावी, असे ट्विट विजय मल्याने आज केले आहे. तसेच पक्षनेते आणि प्रसारमाध्यमांवर पक्षपाती असण्याचा आरोप केला असून मी अपराधी नसल्याचे विजय मल्याने म्हंटले आहे.

ऑगस्टावेस्टलॅंड हेलिकॉप्टर करार घोटाळ्यात सामील दलाल ख्रिस्तियन जेम्स मिशेलला यूएईने भारताच्या ताब्यात दिले आहे. यानंतर काही मिनिटातच विजय मल्याने ट्विट करत कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली. विजय मल्याने म्हंटले कि,  मद्य क्षेत्रातील सर्वात मोठी किंगफिशर कंपनी भारतात मागील तीन दशकांपासून व्यवसाय करत आहे. यादरम्यान आम्ही अनेक राज्यांना हजारो कोटी रुपयांची मदत केली. किंगफिशर एअरलाईन्सने सरकारलाही मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून दिले. परंतु, दुर्देवाने किंगफिशर एअरलाईन्सचे नुकसान झाले. तरीही मी बँकांचे कर्ज फेडू इच्छितो. माझ्यामुळे त्यांना तोटा होऊ नये असे मला वाटते. त्यामुळे बँकांनी हे स्वीकार करावे, असे मल्याने म्हंटले आहे.

-Ads-

मल्या पुढे म्हणाला कि, पक्षनेते आणि प्रसारमाध्यमे माझ्यावर कर्ज बुडवून पळून गेल्याचा आरोप करत आहे. परंतु, यात कोणतेही तथ्य नाही. मी कर्नाटक उच्च न्यायालयात पूर्ण कर्ज फेडण्याचा प्रस्ताव दिला होता, असेही त्याने सांगितले.

बँकांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम हे नुकसान भरुन काढण्यात खर्च झाली. मी बँकांना मुद्दलीतील १०० टक्के रक्कम भरायला तयार आहे. परंतु, व्याज देऊ शकणार नाही. कृपया बँकांनी माझी ऑफर स्वीकारावी, अशी विनंतीही त्याने केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)