…तर शरद पवारांच्या विरोधात निवडणूक लढवायला तयार- जानकर

महाराष्ट्र केसरी होण्यापेक्षा हिंद केसरी होणं जास्त आवडेल

मुंबई: भाजपने जागा सोडल्यास आपण शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवायला तयार आहे. महाराष्ट्र केसरी होण्यापेक्षा हिंद केसरी होणं जास्त आवडेल, अशी इच्छा महादेव जानकर यांनी व्यक्त केली आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. दरम्यान त्यांनी बारामती, माढा, परभणी, हिंगोली, ईशान्य मुंबई, अमरावती या सहा जागेची मागणी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत कमळ फुलणार असल्याचे विधान केले. यावर बोलताना जानकर म्हणाले, “मुख्यमंत्री माझे भाऊ आहेत. पाच मिनिटांच्या मीटिंगमध्ये विषय मिटून जाईल. मुख्यमंत्री आमचे म्हणणे ऐकतील”

शरद पवारांवर टीका करताना जानकर म्हणाले, शरद पवारांचे पूर्वीच स्टेटस राहिले नसल्यामुळे त्यांना निवडणूक लढवावी लागत आहे. हे त्यांचं अपयश आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)