#वाचकांचा पत्रव्यवहार: इव्हीएमचा वापर हवाच 

– शांताराम वाघ, पुणे 
आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यानी इव्हीएमच्या विरोधांत आघाडी उघडली असून अनेक विरोधी पक्ष त्यांत सामील होण्याची शक्‍यता आहे. देशांतील 17 विरोधी पक्ष या आघाडीच्या वतीने निवडणूक आयोगाकडे मतदान मतपत्रिकेद्वारे घेण्याची विनंती करणार असल्याचे वाचले.
सन 1999 च्या निवडणुकानंतर व 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर या मशीनचा वापर निवडणुकासाठी सर्वत्र सुरू झाला. या मशीनमुळे मतदारांचा वेळ वाचतोच शिवाय निकाल लवकर लावणे सोयीचे जाते. पेपर खर्चही वाचतो. वाहतुक, स्टोअरेज व मानधन या खर्चातही कपात होते. निरक्षर व्यक्तींनाही मतदान करणे सोयीचे होते. एकगठ्ठा मतदान करणे शक्‍य होत नाही. बॅलेट पेपरमध्ये शिक्का मारताना अनेक मते बाद होतात. तसे इव्हीएममध्ये होत नाही.
एका सार्वत्रिक निवडणुकीस अंदाजे 10000 टन कागद लागतो, असे आकडे सांगतात. हे निर्माण करण्यासाठी जी प्रचंड प्रमाणांत झाडे तोडावी लागतील त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्‍न निर्माण होणार आहे थोडक्‍यांत इव्हीएम वापरणे किंमत, वेळ, सोय, व पर्यावरण या सर्व दृष्टीने सोयीचे आहे. निवडणूक आयोगाने याबाबतीत मागील वर्षी सर्व राजकीय पक्षांना आवाहन करून जाहीररीत्या या इव्हीएममध्ये फेरफार करून दाखविण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी बहुसंख्याक राजकीय पक्षांनी पाठ फिरविली. आता मात्र हेच राजकीय पक्ष फेरफारीचा आरोप करत आहेत. भाजपाचा विजय झाला की, इव्हीएमवर घसरायाचे! दिल्ली, पंजाब, बिहार, कर्नाटक येथे जेव्हा भाजपाचा पराभव झाला, तेव्हा विरोधी पक्षांना इव्हीएमची आठवण झाली नाही, हे विशेष.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)