वाचा : कोणता पक्ष आहे ओपिनियन पोलमध्ये सरस ?

निवडणूक आयोगाने राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पाच राज्यांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून पाचही राज्यांची मतमोजणी एकाच दिवशी 11 डिसेंबरला होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी आज पत्रकार परिषदेत हा कार्यक्रम जाहीर केला.

या पाच राज्यात बीजेपीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.  एबीपी न्यूज-सी वोटर यांच्या ओपिनियन पोलनुसार आगामी निवडणुकांमध्ये या पाच राज्यात  काँग्रेसचीस्थिती थोडी मजबूत दिसते आहे.  मध्यप्रदेशमध्ये मागील १५ वर्षांपासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. परंतु, या ओपिनियन पोलमधील सर्वेनुसार काँग्रेस येथे सरस ठरत आहे.

-Ads-

मध्य प्रदेश मध्ये किती वोट कोणाला 
बीजेपी- 41.5%
कांग्रेस- 42.2%
अन्य- 16.3%

छत्तीसगडमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. येथे देखील काँग्रेसची सरशी या ओपिनियन पोलमध्ये दिसत आहे. येथील ९० जागांपैकी ४० जागा बीजेपीच्या खात्यात, ४७ जागांवर  काँग्रेसच्या खात्यात तर ३ जागेत अन्य येण्याची शक्यता आहे.

छत्तीसगढ़ मध्ये किती टक्के वोट कोणाला  

बीजेपी- 38.6%
कांग्रेस- 38.9%
अन्य- 22.5%

राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वसुंधरा राजे यानाचे सरकार आहे. एकूण २०० जागांपैकी १४७ जगावर काँग्रेस, बीजेपी ५६  तर २ जागांवर अन्य पक्ष येण्याची शक्यता  एबीपी न्यूज-सी वोटर यांच्या ओपिनियन पोलने वर्तवली  आहे.

राजस्थान मध्ये किती टक्के वोट कोणाला 
बीजेपी- 34%
कांग्रेस- 50%
अन्य- 16%

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)