सीतारामन्‌ यांच्याकडून ‘उरी’ चित्रपटाचे कौतुक

बंगळुरु – उरी : द सर्जिकल स्ट्राइक हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर गाजत आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनीही बेंगळुरूतील सेंट्रल स्पिरीट मॉलमध्ये हा चित्रपट बघितला. माजी सैनिकांसोबत त्यांनी हा चित्रपट पाहिला. सीतारामन यांनी यावेळी चित्रपटातील कलाकारांचे कौतुकही केले. चित्रपट पाहण्यासाठी माजी सैनिकांमध्ये उत्साह दिसून आला.

उरी : द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटातील कलाकारांची निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वीच भेट घेतली होती. भारतीय लष्कराच्या स्थापना दिनानिमित्त लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्या निवासस्थानी त्यांची ही औपचारीक भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी ट्‌विट करत चित्रपटाची प्रशंसाही केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अभिनेता विकी कौशल, यामी गौतम आणि आदित्य धर यांनी रुपेरी पडद्यावर जवानांच्या भावना प्रभावीपणे मांडल्या, असे त्या ट्‌विटमध्ये सीतारामन म्हणाल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)