नोटाबंदीनंतरच्या रद्द नोटा नष्ट करण्याचा खर्च सांगण्यास रिझर्व बॅंकेचा नकार 

नवी दिल्ली – नोटाबंदींनतर रद्द करण्यात आलेल्या रु. 500/- आणि 1,000/- च्या नोटा नष्ट करण्यासाठी किती खर्च आला, हे सांगण्यास आरबीआयने (भारतीय रिझर्व्ह बॅंक) नकार दिला आहे. मध्य प्रदेशच्या आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी माहिती आधिकारात या संबंधी माहिती मागितली होती.

चंद्रशेखर गौड यांच्या प्रश्‍नांना आरबीआयने 29 ऑक्‍टोबर रोजी उत्तर दिले. त्यात सीव्हीपीएस (करन्सी व्हेरीफिकेशन अँड प्रोसेसिंग सिस्टिम) द्वारा रद्द केलेल्या नोटा नष्ट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी जाहीर झाली, तेव्हा रु.500/- आणि रु.1,000 च्या 15,417.93 अब्ज रुपये मूल्याच्या नोटा चलनात होत्या.

त्यापैकी 15,310.73 अब्ज रुपये किमतीच्या नोटा आरबीआयकडे जमा झाल्या. रद्द करण्यात आलेल्या, आरबीआयकडे जमा झालेल्या रु.500/- आणि 1,000/- नोटा नष्ट करण्याचे काम मार्च 2018 अखेर पूर्ण झाले. मात्र या नोटा नष्ट करण्यासाठी सरकारी खजिन्यातून किती खर्च झाला हे सांगण्यास मात्र नकार देण्यात आला असून त्यासाठी आरटीआय कायद्यातील एका तरतुदीचा आधार घेण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)