आरबीआयकडे पैसे मागितले नाहीत फक्त प्रस्तावावर चर्चा

आर्थिक व्यवहार सचिवांचा खुलासा

नवी दिल्ली – सरकारने आपली आर्थिक स्थिती बिकट बनल्याने रिझर्व्ह बॅंकेकडे 3 लाख 60 हजार कोटी रूपयांच्या निधीची मागणी केली असल्याचे जे वृत्त पसरले आहे त्यावर केंद्र सरकारच्यावतीने आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी ट्विटरद्वारे टिपणीकरून काही खूलासा केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यांनी म्हटले आहे की आम्ही आरबीआयकडे 3 लाख 60 हजार कोटी रूपये किंवा एक लाख कोटी रूपये मागितलेले नाहीत. केवळ आरबीआयकडून सरकारला येणाऱ्या निधीविषयीचे फ्रेमवर्क कसे असावे याविषयी आम्ही त्यांच्यापुढे चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. या विषयी माध्यमांमध्ये बराच गैरसमज पसरला आहे पण आम्ही आरबीआयकडे पैसे मागितलेले नाहीत. सरकारची आर्थिक चौकट मजबूत आहे असे गर्ग यांनी म्हटले आहे.

सरकारचे वित्तीय गणित योग्यच राहाणार आहे असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की आम्ही वित्तीय तूट अत्यंत मर्यादेत ठेवली आहे. चालू आर्थिक वर्षातील वित्तीय तूट 3.8 टक्के इतकीच राहील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

आरबीआयकडून सरकारला भांडवल पुरवठा करणे अपेक्षित आहे. त्याची चौकट कशी असावी याविषयी चर्चा करण्याचा प्रस्ताव आम्ही ठेवला आहे. याचा अर्थ सरकारचे आर्थिक गणित बिघडलेले असल्याने आम्ही आरबीआयवर दबाव आणून त्यांच्याकडून 3 लाख 60 हजार कोटी रूपये मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत असा समज पसरलेला आहे तो खरा नाही असे गर्ग यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)