नव्या गव्हर्नरनी आपला ‘धर्म’ पाळावा

सी रंगराजन; आरबीआयची स्वायत्तता जपावी


विकासदराच्या आकडेवारीवरही स्पष्टीकरणाची गरज

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई – यापूर्वी अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदावर नियुक्‍त्या झाल्या होत्या. त्या सर्वांनी रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता जपण्याचा आपल्यापरीने प्रयत्न केला. आता शक्‍तिकांत दास यांनीही स्वायत्तता जपण्याचा धर्म पाळावा, असा सल्ला रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर सी रंगराजन यांनी दिला आहे.

ते म्हणाले की, अगोदर या पदावर नियुक्‍त केलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनी एकदा नियुक्ती झाल्यानंतर बॅंकेची स्वायत्तता जपल्याचा इतिहास आहे. ते म्हणाले की, बॅंकेच्या या पदावर काम करण्याचा एक धर्म आहे, हे आपण आणि इतर गव्हर्नरनी अनेक वेळा सांगितले आहे. त्यात डी. सुब्बाराव यांचाही समावेश आहे.

गव्हर्नरना सरकारबरोबर काम करावे लागते. त्यांनी ते करावे मात्र स्वायत्ततेशी तडजोड करू नये. शक्‍तिकांत दास हे संतुलन पाळतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, महागाई नियंत्रणात असल्यास बॅंकेने इतर विषयांवर सरकार सांगते त्याप्रमाणे जरूर विचार करावा. मात्र, जर महागाई वाढणार असेल तर बॅंकेने इतर सर्व बाबीकडे दुर्लक्ष करून महागाईवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

त्यांनी सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीवर स्पष्टीकरणाची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, विभागाने पूर्वीचा विकासदर कमी आणि आताचा जास्त असल्याचे सांगितले आहे. त्यावर देशात आणि परदेशात शंका घेतल्या जात आहेत. त्यामुळे विभागाने हिशोबाची कोणती पद्धत वापरली, कोणत्या बाबी विचारात घेतल्या याची कारणमीमांसा होण्याची गरज आहे. अन्यथा त्याबाबत संदिग्धता निर्माण होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)