‘रयत शिक्षण संस्था’ शताब्दी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कर्जत – येथील दादा पाटील महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त शताब्दी सप्ताह साजरी करणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी दिली.

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दि. 4 ऑक्‍टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. 2019 मध्ये संस्था स्थापनेस 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शताब्दी महोत्सवाचे आयोजन रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमध्ये केले जाणार आहे.

-Ads-

दि. 5 ते 11 आक्‍टोबर 2018 या सप्ताहामध्ये शताब्दी फलक अनावरण, माजी विद्यार्थी व संस्था हितचिंतक मेळावा, चित्ररथ मिरवणूक, गणित व विज्ञान प्रदर्शन, बॅचलर ऑफ होकेशन इन मेडिसीनल प्लांटस्‌ ग्रोवर या विद्या शाखेचे उद्घाटन, चित्रकला, रांगोळी, क्रीडा, निबंध, वक्तृत्व व काव्यवाचन स्पर्धा, कर्मवीर अण्णांच्या जीवन माहितीपटावरील चित्रपटाचे विद्यार्थ्यांना दाखविणे.

डिजिटल वर्गखोल्या या शताब्दी प्रकल्पाचे उद्घाटन अशा विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन केले आहे. आज (दि.5) रोजी सकाळी 11 वा. होणाऱ्या माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी केले.

What is your reaction?
13 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
1 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)