ट्रॅव्हल्स चालकाची पोलिसावर दादागिरी

चांदणी चौकातील घटना; भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा

नगर -ट्रॅव्हल्स बस चालकास वाहतूक पोलिसाने जीपीओ चौकात थांबण्याचा इशारा केला असता तो बस पळवून घेऊन गेला. चांदणी चौकात सदर बस अडविली असता तेथे त्याने पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून, सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी वैजिनाथ ज्ञानदेव गर्जे (रा. कळमपुरी, पनवेल, मूळ रा. सुरुडी, ता. आष्टी, जि. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सहाय्यक फौजदार महादेव कोलते हे शुक्रवारी (दि.21) जीपीओ चौकात नेमणुकीस होते. कोलते यानी मीनी ट्रॅव्हल्स बसला (क्र. एमएच 04, एफके 9279) थांबण्याचा इशारा केला. परंतु, बस चालक न थांबता निघून गेला. वाहतूक पोलिसांनी त्याला चांदणी चौकात अडविले. त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली.

त्याने पोलीस कर्मचाऱ्यास अश्‍लील शिवीगाळ करीत अरेरावी केली. तसेच सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार महादेव कोलते यांच्या फिर्यादीवरून बस चालक वैजिनाथ गर्जे याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गायकवाड या करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)