रवींद्र धनक यांचे उपोषण मागे

शिरूर (प्रतिनिधी) सं. नं. ११४० मधील वन विभाग दिलेली जागा सोडून तसेच शिरूर नगरपालिकेला दिलेली जलशुद्धीकरणासाठी 90 गुंठे जागा सोडून तसेच जाण्याच्या रस्त्याचे क्षेत्र, तसेच फळ व भाजी मार्केटचे आरक्षण क्षेत्र आबादित राहून क्षेत्र शिल्लक क्षेत्रावर कृषी लोक विकास संशोधन संस्था शिरूर यांच्या जीवन विकास मंदिर माध्यमिक विभाग या शिरूर येथील शाळेच्या सार्वजनिक वापराकरिता ११४० मधील उर्वरित जागेसाठी ही सभा ना हरकत प्रमाणपत्र देण्यात मान्यता देत आहे असा ठराव शिरूर नगर परिषदेच्या वतीने करण्यात आला व या ठरावाची उपोषण करते रवींद्र धनक यांना देण्यात आली यावर त्यांचे तिसऱ्या दिवशी सुरू असलेले अमरण उपोषण त्यांनी मागे घेतले.

काल शिरूर नगर परिषदेच्या वतीने तो खूप केलेली सर्वसाधारण सभा आज घेण्यात आली ही सभा नगराध्यक्ष वैशाली वाखारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. शिरूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अँलीस पोरे , नगराध्यक्ष वैशाली वाखारे यांनी आज या ठारावाची प्रत उपोषण करते रवींद्र यांना दिल्यावर हे उपोषण मागे घेण्यात आली यावेळी मुख्याधिकारी एलिस पोरे यांच्यावतीने लिंबू सरबत रवींद्र धनक यांना देण्यात आला त्यानंतर उपोषण सोडण्यात आले.

सर्वे नंबर११४० पैकी एक हेक्टर सरकारी जागेमध्ये शैक्षणिक उपक्रमाला तात्पुरती जागा द्यावी ,संडास बाथरूम उभारणी करिता जागा द्यावी व पाण्याचे कनेक्शन द्यावे या मागणीसाठी शिरूर नगरपरिषदेच्या दरवाजासमोर शिरुर येथील कृषी लोक विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनी बेमुदत १५ जुलै पासून सत्याग्रही अन्नत्याग आंदोलन  सुरू केले होते आज आंदोलनांचा तिसरा दिवस होता.नगराध्यक्ष वैशाली वाखारे नगरसेवक मुजफ्फर कुरेशी नितीन पाचर्णे संदीप गायकवाड नगरसेवक नगरसेविका आंदोलन कर्ते सुभाष जैन, नगरसेवक मंगेश खांडरे,मनसे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर ,प्रवासी संघटनेचे अनिल बांडे, माधव सेनेचे रवींद्र सानप, भाजप शहराध्यक्ष केशव लोखंडे, ताराबाई पठारे, उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)