रविना टंडन 19 वर्षांनंतरही…

मध्यंतरी रविना टंडन ही “वर्व इंडिया’ या मासिकाच्या कव्हरसाठी फोटोशूट करत होती. वर्व हे उत्साही आणि जोशपूर्ण लोकांसाठीचे मासिक आहे. फोटोशूट करताना या मासिकाला रविना टंडन आजही 19 वर्षांपूर्वीसारखी उत्साहवर्धक वाटत होती. याच मासिकाने 19 वर्षांपूर्वी रविनाची मुलाखत आणि फोटोसेशन केले होते. या मासिकामध्ये रविनाने आपल्या शालेय जीवनातील दिवसांपासून चित्रपटक्षेत्रामध्ये येईपर्यंतचा प्रवास आणि बॉलीवूडमध्ये मिळवलेले स्थान याविषयीच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

रविनाने नेहमीच अभिनयापेक्षा ग्लॅमरला अधिक महत्त्व दिले आहे. त्यामुळेच श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांच्याप्रमाणेच रविनावर चित्रीत झालेली पावसातील गाणी चर्चेत असायची. मोहरा चित्रपटातील “टिप टिप बरसा पानी’ यांसारख्या अनेक गाण्यांमधील रविनाच्या अदा प्रेक्षकांना-चाहत्यांना घायाळ करणाऱ्या ठरल्या. शालेय जीवनातील आठवणी सांगताना रविना म्हणते, लहानपणी आई तिला डोक्‍यावर भरपूर तेल लावून शाळेला पाठवत असे. अशी मुलगीच पुढे जाऊन मस्त मस्त गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली. वर्वसाठी केलेले फोटोसेशन रविनातील उत्साह आजही कायम असल्याचे दर्शवते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)