रोजगारनिर्मिती थंडावलेली नाही – रविशंकर प्रसाद

आयटी क्षेत्रात लाखो नोकऱ्यांची निर्मिती

नवी दिल्ली – रोजगारनिर्मिती होत नसल्याचा कॉंग्रेसचा आरोप हा दिशाभूल करणारा व निराधार असल्याचे माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले व एकट्या माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात पाच वर्षांत 8.73 लाख रोजगार निर्माण झाल्याचे त्यानी सांगितले.

रविशंकर प्रसाद यांनी कॉंग्रेसला आव्हान दिले की, त्यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या शासन काळात रोजगाराची माहिती व आकडेवारी जाहीर करावी. प्रसाद यांनी पत्रकाराशी बोलतांना रोजगाराशी संबंधित आकडेवारी जाहीर केली.

रविशंकर प्रसाद यांनी आयटी क्षेत्राची प्रतिनिधी संस्था नॅसकॉमचा आकडा जाहीर करताना म्हटले की, देशात 41.40 लाख प्रत्यक्ष आणि 1.2 कोटी लोकांना अप्रत्यक्ष रूपाने आयटी क्षेत्रात रोजगार मिळाला आहे. प्रसाद म्हणाले की, ही आकडेवारी माझी नाही, तर उद्योगांची संस्था नॅसकॉमने दिलेली आहे.

प्रसाद म्हणाले की, अर्थव्यवस्था 7.4 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वेगाने वाढत आहे, महामार्ग विक्रमी स्तरावर तयार होत आहेत, बांधकाम क्षेत्र उसळी घेत आहे, जागतिक स्तरावर भारताच्या अर्थव्यवस्थेला मान्यता मिळत आहे, याचा अर्थरोजगार वाढले आहेत.

रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, इलेक्‍ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात 6.7 लाख, कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून 12 लाख, छोट्या शहरांत बीपीओतून 23 हजार, स्टार्टअप आणि आविष्कार क्षेत्रात 49 हजार प्रत्यक्ष आणि 2.5 ते तीन लाख अप्रत्यक्ष रोजगारही निर्माण झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)