रेशन दुकाने होणार बॅंकांचे व्यावसायिक प्रतिनिधी

मुंबई  – महाराष्ट्र सरकारबरोबर येस बॅंकेकडून संयुक्तपणे ई-पीडीएसअंतर्गत रेशनच्या दुकानांना व्यावसायिक प्रतिनिधीचा दर्जा दिला जाणार आहे. यामुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत बॅंकिंग सेवा उपलब्ध करून देत रेशन दुकान मालकांना उत्पन्न वाढीच्या अतिरिक्त संधी मिळणार आहेत.

येस बॅंक 12 जिल्ह्यांतील 40 टक्के रेशन दुकानांना आपले व्यावसायिक प्रतिनिधी बनवणार असून त्यामुळे 20 हजारपेक्षा जास्त रेशनची दुकाने व पर्यायाने 70 लाख नागरिकांना फायदा होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट म्हणाले, ‘ईपीडीएस डिजिटल उपक्रमामुळे महाराष्ट्रातील 10 लाख बोगस रेशन कार्डांचा छडा लावण्यास मदत झाली तसेच सरकारसाठी मालाचे व्यवस्थापन डिजिटली करणे शक्‍य झाले. ईपीडीएस उपक्रमामुळे नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवून अतिरिक्त उत्पन्न कमावण्याच्या संधीही मिळणार आहेत. नागरिकांनाही जवळच्या रेशन दुकानात पैसे काढण्याची व इतर बॅंकिंग सेवांचा लाभ घेण्याची सुविधा मिळणार आहे’.

बॅकेचे डिजिटल अधिकारी रितेश पै म्हणाले की,’रेशन दुकान मालक हे बॅंकेच्या सक्रिया व्यावसायिक प्रतिनिधींपैकी एक आहेत या दालनांद्वारे दरमहा आठ लाख व्यवहार केले जातात’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)