रेशन कार्डावर आता आयोडीनयुक्त मीठ मिळणार 

मुंबई – जेवणामध्ये मीठ हा महत्वाचा घटक आहे. मिठाशिवाय जेवणाला चव येत नाही. त्यामुळे आहाराची सकसता वाढविण्यासाठी आणि महिलांमधील ऍनिमियाचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार टाटा ट्रस्टच्या सहाय्याने रास्तभाव दुकानातून शिधापत्रिकेवर “लोह आणि आयोडिनयुक्त'(डबल फोर्टीफाईड) मीठ वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत आज मीठ वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ चितपावन ब्राम्हण संघ सभागृह, गिरगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते आणि उद्योगमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री, सुभाष देसाई व, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या शिधापत्रिकेवर रास्त दरात गहू, तांदूळ आणि तूर डाळ देण्यात येते. तर दिवाळीसाठी शिधापत्रिकाधारकांना प्रति कार्ड 1 किलो 20/- रूपये या दराने साखर वाटप करण्यात येत आहे. तर, प्रति कार्ड 1 किलो चणाडाळ व एक किलो उडीदडाळ किंवा दोन्ही पैकी कोणतीही एक डाळ 2 किलो, प्रतिकिलो 35/- रूपये या दराने उपलब्ध होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)