रथयात्रेसाठी पश्‍चिम बंगालमध्ये भाजप करणार तीव्र आंदोलन

नवी दिल्ली – प. बंगालमध्ये भाजपच्या प्रदेश शाखेने 3 जानेवारी रोजी कोलकाता येथे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यानी जोरदार तयारी सुरू केली असल्याचे वातावरण आहे.

भाजपने राज्यातील रथयात्रेबद्दल निर्माण झालेली अनिश्चितता पाहता ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधात राज्यव्यापी निदर्शने करण्याच्या धोरणांतर्गत हा निर्णय घेतला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रथयात्रेच्या माध्यमातून राज्यातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजपने चालविला आहे. भाजपकडून राज्यात प्रस्तावित रथयात्रेला कलकत्ता उच्च न्यायालयाने मंजुरी दिलेली नाही.

याप्रकरणी भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असली तरीही तेथे तत्काळ सुनावणी होणार नसल्याने पक्षाला निराशा पत्करावी लागली आहे. त्याचाही पाठपुरावा भारतीय जनता पक्ष आगामी काळात करणार आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा उत्तर बंगालच्या कूचबिहार येथे या यात्रेचा 7 डिसेंबर रोजी शुभारंभ करणार होते. परंतु ममता बॅनर्जी सरकारने यात्रेला मंजुरी देण्यास नकार दिला होता. रथयात्रेमुळे राज्यातील सांप्रदायिक सौहार्दाला धक्का बसू शकतो असा युक्तिवाद राज्य सरकारने केला होता.त्यावर राज्य सरकार ठाम आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)