महिला फुटबाॅल : भारतीय संघाचा इंडोनेशियावर 3-0 ने सहज विजय

नवी दिल्ली – दुसऱ्या सत्रात रतनबाला देवी हिच्याा हॅट्रिकच्या जोरावर भारतीय महिला फुटबाॅल संघाने रविवारी मैत्रिपूर्ण सामन्यात इंडोनेशियाचा 3-0 ने पराभव केला. टोकियो ओलम्पिक क्वालीफायर राउंड-2 च्या तयारीअंतर्गत भारतीय संघ इंडोनेशिया विरूध्द मैत्रिपूर्ण सामने खेळत आहे. दुसरा आणि अंतिम सामना 30 जानेवारीला होणार आहे.

याआधी भारतीय महिला संघाने मैत्रिपूर्ण सामन्यात हॉंगकॉंगला पराभूत केले होते. भारतीय महिला फुटबॉल संघाची विजयी घोडदौड कायम असून हॉंगकॉंग आणि इंडोनेशिया दौऱ्यामधील सलग तिसरा विजय ठरला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रतनमाला देवीची कारकीर्दीमधील ही दुसरी हट्रिक ठरली. रतनमाला हिने सामन्याच्या दुसऱ्या सत्रात 67 व्या, 70 व्या आणि सामना संपण्यापूर्वी 78 व्या मिनिटाला अखेरचा गोल केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)