रतन टाटा यांच्या भूमिकेत बोमन इराणी

बॉलीवूडमध्ये सध्या राजकीय नेत्यावरील चित्रपट एका पाठोपाठ येत आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित “पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रसिद्धीच्या झोतात आहे. या चित्रपटात प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांच्या भूमिकेत अभिनेता बोमन इराणी झळकणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच अहमदाबादमध्ये करण्यात येणार आहे.
“पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार, तर सुरेश ओबेरॉय या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांची भूमिका अभिनेता विवेक ओबेरॉय साकारणार आहे. तर प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांची भूमिका बोमन इराणी करत आहेत. शिवाय बोमन इराणी यांनी चित्रपटातील रतन टाटा यांच्या भूमिकेचे चित्रीकरणही पूर्ण केल्याची माहिती आहे.

आपल्या भूमिकेबाबत बोमन इराणी म्हणाले, मी रतन टाटा यांच्यासारखा दिसत असल्याने अनेकांनी मला सांगितले आहे. याशिवाय सोशल मीडियावरही अशा कॉमेंट्‌स यायच्या. तेव्हापासून मला असं वाटायचं की मला रतन टाटा यांची भूमिका साकारायला मिळावी. दिग्दर्शक ओमंग कुमार आणि विवेक ओबेरॉय यांनी जेव्हा मला या भूमिकेसाठी विचारले, तेव्हा मी एका क्षणाचा विलंबही न करता तातडीने होकार दर्शविला. भारताचे ज्येष्ठ उद्योगती रतन टाटा यांची भूमिका साकारणे माझ्यासाठी एक आव्हान आहे, असे इराणी म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)