राष्ट्रीय समाज पक्षाकडून 12 जणांची यादी जाहीर

नगर – राष्ट्रीय समाज पक्षाने महापालिका निवडणुकीसाठी 12 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्व समावेश अशी ही यादी असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.

उमेश साठे, आम्रपाली शेंडगे, प्रसाद खरात, गोकुळ सोनवणे, ऍड. राणी भुतकर, दिनेश देशपांडे, ज्योती साठे, सुनीता आदमने, सय्यद सना मोहमंद अली, तन्वीर पठाण, चंद्रकांत उजागरे, मेघना टेपाळे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. पक्षाचे मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतले निरीक्षक नितीन धायगुडे, जिल्हाध्यक्ष रवींद्र कोठारी, शहर जिल्हाध्यक्ष डी. आर. शेंडगे यांनी ही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

-Ads-

भारतीय जनता पक्षाबरोबर युती करायची का नाही याचा फैसला पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीत होईल. महादेव जानकर शुक्रवारी नगरमध्ये येणार असून युतीबाबत पदाधिकाऱ्यांशी व उमेदवारांशी चर्चा करतील अशी माहिती मुख्य महासचिव दोडतले यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)