गुन्हेगारांनो गुन्हेगारी सोडा

नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम यांचा इशारा

पुणे – गुन्हेगारांनो गुन्हेगारी सोडा, असा इशारा पुणे शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिला आहे. डॉ. के. व्यंकटेशम मावळत्या पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्याकडून शुक्रवारी पदभार स्वीकारला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शहरातील गुन्हेगारी मोडण्याचे सूचक वक्तव्य केले.

-Ads-

पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद असून ही मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी टिकविण्याचे प्रयत्न केले जातील. पुणे शहरातील बडी कॉप योजनेची नागपूरमध्येही अंमलबजावणी करण्यात आली होती. सध्या जेवढ्या चांगल्या योजना सुरू आहेत, त्या पुढेही कायम ठेवल्या जातील असे ही डॉ. के. व्यंकटेशम म्हणाले. राज्य गृह विभागाने सोमवारी अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या 11 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची बदली पुण्यात करण्यात आली. तर पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांची मुंबईत अप्पर पोलीस महासंचालक (महामार्ग) म्हणून बदली करण्यात आली आहे.

डॉ. के. व्यंकटेशम नागपूरचे पोलीस आयुक्त असताना नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली होती. अगदी मुख्यमंत्र्यांच्या राहत्या घराच्या परिसरातही खूनाच्या घटना घडल्या होत्या. मुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातच गुन्हेगारीने कळस गाठला होता, यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. या पार्श्‍वभूमीवर डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुणे पोलीस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली आहेत.


मावळत्या पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला व माजी सह आयुक्त सुनील रामानंद यांनी संघटीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोक्का आणि तडीपारीच्या कारवाया मोठ्या प्रमाणात केल्या होत्या. सध्याही संघटीत टोळ्यांचे म्होरके व अनेक गुन्हेगारा मोक्का अंतर्गत कारागृहात आहेत. यामुळे शहरातील संघटीत गुन्हेगारीला मागील दोन वर्षात आळा बसला आहे. यामुळे डॉ. के. व्यंकटेशम यांच्यापुढे संघटीत गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)