राशीनच्या जगदंबा मंदिरात घटस्थापना; नवरात्री प्रथम पर्वास प्रारंभ

राशीन : येथील जगदंबा देवी मंदिरात पारंपरिक पद्धतीने विधिवत घटस्थापना करण्यात आली.

कर्जत – लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या राशीन व कुळधरणच्या जगदंबा देवी मंदिरात पारंपरिक पद्धतीने विधिवत घटस्थापना करण्यात आली. नवरात्रातील पहिल्या पर्वास आरंभ झाला. राशीनला आखोबा स्वामीचे वंशज महेशस्वामी शेटे व गुरव पुजारी सुनील रेणूकर यांचे हस्ते घटस्थापना झाली. कुळधरण येथे राजू पाटील यांच्या हस्ते घटस्थापना झाली.

यावेळी मानकरी कुटुंबातील मानकरी व विविध भागातील भाविक उपस्थित होते. पहाटे देवीची महापूजा केल्यानंतर सकाळी पारंपारीक पद्धतीने घटस्थापना होऊन समोर अखंड नंदादीप पेटविण्यात आला. नवरात्राच्या पुर्वसंध्येला विविध ठिकाणच्या तरूण मंडळांनी ज्योत पेटवून प्रस्थान केले. यावेळी देवीच्या नामघोषाने परीसर दुमदुमून गेला होता.

-Ads-

कुळधरण तसेच राशीन येथे अनेक भाविक मंदिरात घंटी बसतात. मंदिर परिसरात प्रतिदिन धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवरात्रानिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे मंदिर परिसर गजबजून गेला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)