मॅंचेस्टर – इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन याने सतरा षटकारांचा विक्रम करीत धावांचा पाऊस पाडला, त्यामुळेच त्याच्या संघास दुबळ्या अफगाणिस्तानविरुद्ध 50 षटकांत 6 बाद 397 धावांचा डोंगर रचला.
अफगाणिस्तानच्या रशीद खान याने महागडी गोलंदाजी करण्याची कामगिरी केली. त्याने नऊ षटकांत 110 धावा दिल्या. पाकिस्तानच्या वहाब रियाज यानेही एकाच सामन्यात 110 धावा दिल्या होत्या.दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 बाद 397 धावा केल्या.